मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरु! येथे अर्ज करा लगेचभांडी संच मिळणार Mofat Bhandi Yojana

Mofat Bhandi Yojana: तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहात का? तुमच्यासाठी एक मोठी आणि अत्यंत उपयुक्त बातमी आहे! महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून (MBOCWWB) ‘भांडी किट योजना’ अंतर्गत मोफत गृहपयोगी वस्तूंचा संच देण्यासाठी अर्ज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. या योजनेत पात्र कामगारांना ३० विविध वस्तूंचा संच मोफत मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरु!

येथे अर्ज करा

योजनेचे मुख्य उद्दिष्ट

बांधकाम कामगारांना नोकरीच्या निमित्ताने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागते. यामुळे त्यांना राहण्याची, जेवणाची आणि इतर व्यवस्था पुन्हा नव्याने करावी लागते. या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश नोंदणीकृत कामगारांना गृहपयोगी भांडी मोफत देऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे.

भांडी किटमधील वस्तूंची यादी (३० नग)

या मोफत संचामध्ये कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या खालील ३० वस्तूंचा समावेश आहे

वस्तूचे नाव नगांची संख्या
ताट ०४
वाट्या ०८
पाण्याचे ग्लास ०४
पातेले झाकण्यासह ०१
कढई (स्टील) ०१
प्रेशर कुकर (५ लिटर, Stainless Steel) ०१
परात ०१
डब्बा झाकण्यासह (१४ इंच) ०१
डब्बा झाकण्यासह (१६ इंच) ०१
डब्बा झाकण्यासह (१८ इंच) ०१
मसाला डब्बा (सात भाग) ०१
पाण्याचा जग (२ लिटर) ०१
मोठा चमचा (भात वाटपाकरिता) ०१
मोठा चमचा (वरण वाटपाकरिता) ०१
पातेले झाकणासह (छोटी साईज) ०१
एकूण ३०

पात्रता निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे

आवश्यक पात्रता

  • नोंदणी: अर्जदार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा सक्रिय नोंदणीकृत कामगार असावा.
  • वास्तवता: कामगाराचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षांचे वास्तव असावे.
  • कामाचा अनुभव: मागील १२ महिन्यांच्या कालावधीत ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.

अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगारांना मंडळाच्या पोर्टलवर उपलब्ध असलेला विशिष्ट अर्ज (फॉर्म) भरून सादर करायचा आहे. फॉर्ममध्ये तुमचा नोंदणी क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि इतर माहिती भरणे आवश्यक आहे.

किट स्वीकारण्याचे नियम

  • गृहपयोगी वस्तूंचा संच स्वीकारताना त्या वस्तूंचा दर्जा तपासावा.
  • वस्तूवर मंडळाचे नाव (एम्बॉसिंग/लेझर एन्ग्रेव्हिंग) असल्याची खात्री करावी.
  • किट मिळाल्यानंतर, पोचपावती (Acknowledgment Receipt) संबंधित सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी) यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे.

या योजनेमुळे कामगारांचे भांडी खरेदीवरील पैसे वाचतील आणि त्यांना चांगल्या दर्जाची भांडी मोफत मिळतील. पात्र बांधकाम कामगारांनी लवकरात लवकर अर्ज करून या मोफत संचाचा लाभ घ्यावा.

Leave a Comment